मला शाळेला जायचंय...
आई दे ना ग! पुस्तक व SS ही....
मला शाळेला जायचंय बाई...||धृ||
आई ऊठ ना सकाळ झाली
टाक आंघोळीला पाणी
कशी तुला ग चिंता ना SS ही.....
मला शाळेला जायचंय बाई ||१||
कर चटकन् पोळी भाजी
काही मदत करु का तुझी
चल कर ग थोडी घा SS ई
मला शाळेला जायचयं बाई ||२||
बाबा चला चला हो आता
थोडे काम बाजुला टाका
घंटा शाळेची ऐकू ये SS ई ||३||
दिवस पहिला ग शाळेचा
नाही उशीर चालायचा
चालले दादा नि ता SS ई
मला शाळेला जायचंय बाई ||४||
नको चिंता करु ग आई
तिथे तुझ्यासारख्याच बाई
बघ शिकून मी मोठी हो SS ई
मला शाळेला जायचंय बाई ... ||५||
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
*शिल्पा म.वाघमारे*
सहशिक्षिका, मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
🙏 🙏 🙏 🙏 🙏
आई दे ना ग! पुस्तक व SS ही....
मला शाळेला जायचंय बाई...||धृ||
आई ऊठ ना सकाळ झाली
टाक आंघोळीला पाणी
कशी तुला ग चिंता ना SS ही.....
मला शाळेला जायचंय बाई ||१||
कर चटकन् पोळी भाजी
काही मदत करु का तुझी
चल कर ग थोडी घा SS ई
मला शाळेला जायचयं बाई ||२||
बाबा चला चला हो आता
थोडे काम बाजुला टाका
घंटा शाळेची ऐकू ये SS ई ||३||
दिवस पहिला ग शाळेचा
नाही उशीर चालायचा
चालले दादा नि ता SS ई
मला शाळेला जायचंय बाई ||४||
नको चिंता करु ग आई
तिथे तुझ्यासारख्याच बाई
बघ शिकून मी मोठी हो SS ई
मला शाळेला जायचंय बाई ... ||५||
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
*शिल्पा म.वाघमारे*
सहशिक्षिका, मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
🙏 🙏 🙏 🙏 🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा