कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

माणसं जोडणं

माणसं जोडणं


जेवढं सोपं असतं माणसं जोडणं
तेवढंच सहज असतं ते बंध टिकवणं

त्यावर हवी असते मायेची पाखर
रसनेवर असावी थोडीशी साखर

कधी थोडे थोडकं दुःखही सहावं
धर्मभेद विसरून सरितेवत वहावं

धरेचं स्थैर्य नि आभाळाचं काळीज असावं
अथवा माणुसकीचं गावही न पुसावं

मायेच्या पंखाखाली शितल द्यावी सावली
कधी व्हावं बाप, तर कधी कोमल माऊली

जो तो या स्नेहबंधात आपसूकच खेचून येईल
बघा मग जग हे माणसाचं किती सुंदर होईल


माणसानं माणूस होणं एवढंही अवघड नसतं
जोडण्याइतकंच ते टिकवणंही सोपं असतं

रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
🙏 🙏 🙏 🙏 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: