अद्भुत रस रचना
शोध दिव्यत्वाचा
नवलाईची बीजे निरंतर
कणाकणांत येथे पेरलेली
अद् भूत अद् वितीय पुष्पे
जीवनमालेत गुंफलेली ||१||
बाह्यजगापरी अंतरंगीही
अनोखं एक जगत् आहे
स्वयंसिद्ध आत्मरुप तेज ...
तुझ्यातले अद् भूत आहे ||२||
अचाट शक्तींचे भांडार
वसले आहे तुझ्यात सुप्त
वेध घेण्या धाव एकांती
मन स्वतःत होऊ दे जप्त ||३||
अचंबित तेजस्पर्शी दिव्ये ती
नि वाट निसरडी संसाराची
तू स्थितप्रज्ञ तू स्वयंप्रकाशी
ओळख तुज होईल स्वतःची || ४||
सळसळती नागीणच ती
कुंडलिनी उसळती लाट
अलिप्तता संसारी राहु दे
परमसुखाची तीच वहिवाट...||५||
सत्त्वज्ञान तुला लाभता रे
अढळपदीचा होशील तारा
तेजहीन चांदणे भोवतीचे
तूच तुझ्यात चैतन्य गाभारा.. ॥६||
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि 22.12.2018
भ्र क्र 9527054205
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा