कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

योगिराज गजानन

योगिराज गजानन ....

स्विकार वंदना | ब्रम्हांडनायका
राजाधिराजा तू | गजानना ||

कलियुगी जन्म| मज पामराचा
आशीष सुमांचा| डोई सडा ||

आम्हा रक्षिण्यास| झालासे कवच
राणा गजानन | योगिराज ||

कोण? मी कोठले?| भाग्य ते मिळाले
आपसूक प्राप्ती | परमसुखे ||

कृपाप्रसादाने| झोळी ही भरली
ईशकृपा झाली| जीवनात ||

सार्थ जन्म माझा | झालासे प्रेरणा ||
माझिया कारणा | धन्य धन्य ||

दिव्य तेजसुर्ये | तुजठायी स्थित
चरणी वाहिली | शब्दफूले ||

पावन चरणी | करिते अर्चना
समृद्धी जीवना| लाभो सदा ||


रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. 17.11.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: