उबाय...
उबायच पेटला व्हता मनात
जा तूनंई बी आरोप केल्ता
बाकीच्याईचं तं इचारई नाई आला
पन तू बी कसा ईस्वासघातकी झाल्ता
वाटलं काई फायदा नाई
दैव नाई ना देव आपला
जीव आटोला जैच्यासाटी
तैनच ऊरात सुरा खुपला
खऱ्याची नाई रायली दुनिया
काई करुन उपकार न्होते
उभायाचे भडके आता
मले सईन होत न्होते
खार झाल्ता कायजाचा
न् जीवच द्याले गेल्ती
पन चिली पिली लेकरं
रस्त्यात आडी झाल्ती
म्या मलेच समजोल
म्हटलं हे शक्यचं होनार नाई
म्या जीव वायला ज्याले
तो असा मन मोडनार नाई
लेकराईच्या तोंडाक्ळे पाऊन
डोयातल्या त्या आसवाईनं
ताप मनाचा मंग इजोला
चुलीपुडे भिजला जीव घामानं
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
30.11.2018
उबायच पेटला व्हता मनात
जा तूनंई बी आरोप केल्ता
बाकीच्याईचं तं इचारई नाई आला
पन तू बी कसा ईस्वासघातकी झाल्ता
वाटलं काई फायदा नाई
दैव नाई ना देव आपला
जीव आटोला जैच्यासाटी
तैनच ऊरात सुरा खुपला
खऱ्याची नाई रायली दुनिया
काई करुन उपकार न्होते
उभायाचे भडके आता
मले सईन होत न्होते
खार झाल्ता कायजाचा
न् जीवच द्याले गेल्ती
पन चिली पिली लेकरं
रस्त्यात आडी झाल्ती
म्या मलेच समजोल
म्हटलं हे शक्यचं होनार नाई
म्या जीव वायला ज्याले
तो असा मन मोडनार नाई
लेकराईच्या तोंडाक्ळे पाऊन
डोयातल्या त्या आसवाईनं
ताप मनाचा मंग इजोला
चुलीपुडे भिजला जीव घामानं
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
30.11.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा