अंतिम सत्य....
कालगतीच्या चक्रातला
"मी" आहे एक आत्मा
अंतर्मनास जागवल्यावर
विश्वव्यापी मीच परमात्मा... १
युगायुगांच्या फेर्यांचे
पायी माझ्या बंधन आहे
अविनाशी निर्मिकाच्या
हृदयाचे मी स्पंदन आहे...२
जननमरणाच्या गुंत्यात या
माणूस बनून जगतेय मी
विकारांच्या बिकट मार्गातून
सत्य वाट काढू बघतेय मी.... ३
माणसांच्या जगामधे
माणुसकी जपते मनी
समस्त चराचरांठायी
एकच प्रतिमा नयनी....४
विसरुन चालणार नाही येथे
हे जगत् आहे फक्त मिथ्य
गुंतवून घेत नाही मी स्वतःला
कारण मृत्यू हेच अंतिम सत्य.... ५
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि. बीड
दि. 19.11.2018
कालगतीच्या चक्रातला
"मी" आहे एक आत्मा
अंतर्मनास जागवल्यावर
विश्वव्यापी मीच परमात्मा... १
युगायुगांच्या फेर्यांचे
पायी माझ्या बंधन आहे
अविनाशी निर्मिकाच्या
हृदयाचे मी स्पंदन आहे...२
जननमरणाच्या गुंत्यात या
माणूस बनून जगतेय मी
विकारांच्या बिकट मार्गातून
सत्य वाट काढू बघतेय मी.... ३
माणसांच्या जगामधे
माणुसकी जपते मनी
समस्त चराचरांठायी
एकच प्रतिमा नयनी....४
विसरुन चालणार नाही येथे
हे जगत् आहे फक्त मिथ्य
गुंतवून घेत नाही मी स्वतःला
कारण मृत्यू हेच अंतिम सत्य.... ५
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि. बीड
दि. 19.11.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा