कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

गणाधीशा



शीर्षक :  गणाधीशा

गणाधीशा तुज
प्रथम वंदना
तुझिया पुजना
सृष्टी फुले... १

लोभस गोजिरे
अनोखेच रुप
साजते अनुप
लोचनांत... २

शिवगौरीसुता
मुषकवाहका
हे विद्यादायका
लंबोदरा...३

प्रिय तुज दुर्वा
सुमन जास्वंदी
वाहता त्वापदी
हर्षतोस...४

मोदक लाडूचा
मेवा एकदंता
अर्पिते अनंता
सेवा जाण...५

देवा गुणातीता
नेई मोहमाया
विश्व हे तराया
होय साक्षी... ६

श्वास आश्वासले
फक्त तुझे ठायी
विनवते पायी
तार जीवा... ७

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि. ०७.०९.२०१९