कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

दर्पण काव्यप्रकार मोगरा 🌼

दर्पण काव्यप्रकार
मोगरा 🌼


मोगरा
पानोपानी दडलेला

मोगरा
गजरा होऊन केसांत माळलेला

मोगरा
ज्याच्या सुगंधाने आकर्षून मजवर तूही भाळलेला

मोगरा
साक्ष,पहिल्या भेटीत तू माझ्या अधरी प्रीतठसा कोरलेला

मोगरा
पहिल्या मधुरातीची निरंतर आठवण करवून पुन्हा पुन्हा प्रणयी निरोप धाडलेला

मोगरा


रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
8.12.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: