मोक्षाचा मानकरी(अनुप्रास रचना)
रामरंगी रंगले
चित्तचोर चरणी
शब्द शब्द शिंपिता
राममय रे रमणी...🙏
कर कटेवरी
सावळी साजिरी
मन मोहवले माझे
स्वर्गसुख ना संसारी...🙏
तोचि तापनाशी
पंढरीचा पांडुरंग
वेणू वाजताच
गोप गवळणी गुंग...🙏
श्वासा_श्वासात शोधला
दशदिशांत दाटला
माधव मनोहर माझ्या
ऊरातचि ऊरला...🙏
मीच माझ्या मना
भाव भक्तीने भारले
त्या तेजाने तेथेच
दिव्य दर्शन दिधले.... 🙏
नारायण नामी
गुंतले, गुंफले
मोक्षाची मानकरी
नकळत निवडले... 🙏
. रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड.
दि. 3.12.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा