बाप माझा.......
चाळण जीर्ण कापडांची
काळजाचीही तीच दशा
फक्त फक्त माझ्यासाठी
धुंडाळतो दाही दिशा....१
दारिद्र्य नि उन्हाच्याही
पायी सोसतोया झळा
चटकेच आमच्या नशीबी
आयुष्यात सदा उन्हाळा...२
नाही तमा मज वसनांची
स्वर्ग सुख या खांद्यावरी
झाला पांडुरंगच हा बाप
माझी दुःखं वाहतो सारी...३
कलिका ही फुलवण्या
कधी ऊब तो मायेची
भयभीत तुफानी या
आस तोच मज छायेची...४
जीव उगाळून हा जरी
त्याच्या पायाशी वाहिला
निर्व्याज गणित ऋणांचे
नाही सुटणार हो मला...५
भाग्यश्रीमंतीशी माझ्या
करु नकाच तुलना
विठू आला माझ्यासाठी
माझी मोक्षात गणना....६
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि.९.१२.२०१६
चाळण जीर्ण कापडांची
काळजाचीही तीच दशा
फक्त फक्त माझ्यासाठी
धुंडाळतो दाही दिशा....१
दारिद्र्य नि उन्हाच्याही
पायी सोसतोया झळा
चटकेच आमच्या नशीबी
आयुष्यात सदा उन्हाळा...२
नाही तमा मज वसनांची
स्वर्ग सुख या खांद्यावरी
झाला पांडुरंगच हा बाप
माझी दुःखं वाहतो सारी...३
कलिका ही फुलवण्या
कधी ऊब तो मायेची
भयभीत तुफानी या
आस तोच मज छायेची...४
जीव उगाळून हा जरी
त्याच्या पायाशी वाहिला
निर्व्याज गणित ऋणांचे
नाही सुटणार हो मला...५
भाग्यश्रीमंतीशी माझ्या
करु नकाच तुलना
विठू आला माझ्यासाठी
माझी मोक्षात गणना....६
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि.९.१२.२०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा