कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

गंध तुझा

गंध तुझा...


गंध तुझा की फुललीच बकुळ
मज ओढते का प्रणयी ही ओढ

गंधी तुझिया मी भारलेला जणू
कलिकाबंद त्या भ्रमराची खोड

निमित्ते त्यासम निशा घालवी मी
बाहुपाशी घट्ट,जरी विनवी तू
'सोड'

अधरांचे न चालतील तेथे बहाणे
अधीर चाखण्या ते मकरंद गोड

नाद लय पुन्हा आरोहीच चढवी
प्रीत बहरली बघ सखे ही अजोड

छंद अनामिक गंध लावून कलिके
रजनीगंधेशीही जिंकलो आज मी होड...


रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
30.11.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: