महिमा मातेचा*
##########
वात्सल्याची मुर्ती
आई माझी शान
ईशरुप महान
ब्रह्मरूप . . .॥१॥
माझिया मातेची
विश्वात महती
तिजविण गती
काय माझी. ।॥२॥
मायेचा पदर
शीतल छायेचा
जन्म पुण्याईचा
हेचि भाग्य . .॥३॥
फेडू कसे पांग
असीम अपार
उपकार थोर
जन्मोजन्मी . . ॥४||
मजला लाभला
स्वर्ग धरेवरी
त्या चरणांवरी
नित्य नत .. .||५||
रचना. . .
शिल्पा म.वाघमारे
स.शि. बीड
१४.१०.१८
##########
वात्सल्याची मुर्ती
आई माझी शान
ईशरुप महान
ब्रह्मरूप . . .॥१॥
माझिया मातेची
विश्वात महती
तिजविण गती
काय माझी. ।॥२॥
मायेचा पदर
शीतल छायेचा
जन्म पुण्याईचा
हेचि भाग्य . .॥३॥
फेडू कसे पांग
असीम अपार
उपकार थोर
जन्मोजन्मी . . ॥४||
मजला लाभला
स्वर्ग धरेवरी
त्या चरणांवरी
नित्य नत .. .||५||
रचना. . .
शिल्पा म.वाघमारे
स.शि. बीड
१४.१०.१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा