वीररस रचना
शूर संभाजी
धगधगत्या ज्वालाच उसळत्या
"युगपुरुषाचे" ते रक्त होते
वीर श्री संभाजी हेच खरे
मायभूचे असीम भक्त होते.. १
जबड्यात घालुनी कर सिंहाच्या
दात मोजले या पठ्ठ्याने
जनहितासाठी घातक जे
उपटून फेकले तण त्याने.. २
ना झुकला, ना नमला जो
अजिंक्य नायक विश्वाचा
मर्दानी तो गडी रांगडा
शूर छावा शिवसिंहाचा.. ३
"श्री शंभो शिवजातस्य.."
ब्रीद हे प्रेरक कोरूनी
राष्ट्रहितार्थ झटला निशदिन
अमाप स्वप्ने होती नयनी.. ४
परमप्रतापी महापराक्रमी
सहस्र सूर्यांची दिव्यप्रभा
प्राण कंठाशी आले जरी
जपली शिवतेजाची आभा.. ५
वीरमातेचा वीरपुत्र एक
स्वराज्य संस्थापक शिवा होता
महादानी स्वयंप्रकाशी
दुजा मर्द शंभूराजा होता.. ६
एक नटलेली प्रतिभा कोमल
दुजी ती पोलादी छाती
अद्भुत अलंकाराने सजवी
साकारी "बुधभूषण राजनीती".. ७
मायभूसाठी ज्योती ती
प्राणांतीही लढत होती
मृत्यूच्या थरारातही
धुंदी "त्या" पुन्हा चढत होती.. ८
प्रेरणास्तंभ होऊन गेला
या अवघ्या महाराष्ट्रासाठी
प्रबळ झुंजला क्षणोक्षणी तो
फक्त नि फक्त सुराज्यासाठी.. ९
रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
1.10.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा