कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

🚩गर्जा महाराष्ट्र माझा


गर्जा महाराष्ट्र माझा

मायभूमी या महाराष्ट्राला
शोभती अखंड किर्तीतोरणे
धमन्यांतील रुधिरास चेतवी
नित्य कर्तव्याची स्फुरणे...१

ज्ञान उगम नि तपोभुमी ही
ही तर संगम दिव्यत्वाचा
शिवसिंहाचा छावा शंभू
नि शिवा मर्दानी जिजाऊंचा...२

रांगडी मराठी शान आमुची
अभिमान असे महाराष्ट्राचा
अमृतासह जिंके पैज जी
ठेवा ती अनुपम माधुर्याचा... ३

सुसंस्कारे त्या आम्ही भारलो
साक्षी नभीचे दुधी चांदणे
सूर आमुचे जरी निराळे
गाऊ एकच मंजुळ गाणे... ४

धर्म,भाषा आणि जाती
पुसू नका कोणा येथे
चराचरांशी कृतज्ञतेचे,
माणुसकीचे जपतो नाते... ५

जागूनी वाचनास सदा
थोर वारसा युगे चालवू
जयगीत गाऊया महाराष्ट्राचे
स्वर 'तार' सप्तकात चढवू... ६

'अरबी' लाटांची गाज सदोदित
गातसे पोवाडा मन्मातेचा
सह्यगिरीचा शिखर 'कळसु'
अभिमान मिरवी काळ्या मातीचा..


चैतन्य झळाळी अशी जणू
साकारावी 'अमृतमंथनी'
तेवत ठेवू प्रज्ज्वल ज्योती
आस प्रदिप्त हिच मनी... ८

मान वाढवू महाराष्ट्राचा
चला आज या विश्वांगणी
वाकून मुजरा माझा तिजला
सर्वस्वच अर्पिते चरणी... ९

शाश्वत आदर्शांचे हे लेणे
रोमारोमांमध्ये सदैव भिनवू
हवा असे जर पुन्हा 'शिवाजी'
'जिजाऊ'च ती आधी घडवू... १०

रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका
जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड




गर्जा महाराष्ट्र माझा

मायभूमी महाराष्ट्राला
 अखंड किर्तीतोरणे
धमन्यांतील रुधिरास चेतवी
कर्तव्याची स्फुरणे...१

ज्ञान उगम ही तपोभुमी ही
 संगम दिव्यत्वाचा
शिवसिंहाचा छावा शंभू
अन् शिवबा जिजाऊंचा...२

रांगडी 'मराठी' शान आमुची
अभिमान महाराष्ट्राचा
अमृतासह जिंके पैजा
'ती' ठेवा माधुर्याचा... ३

संस्कारांनी आम्ही भारलो
साक्षीला हे चांदणे
सूर आमुचे जरी निराळे
जुळले मंजुळ गाणे... ४

धर्म, जाती, भाषा बोली
पुसू नका कोणा ते
चराचरांशी कृतज्ञतेचे,
 जपतो कोमल नाते... ५

जागूनी वचनास सदा
वारसा युगे चालवू
जयगीत गाऊया महाराष्ट्राचे
स्वर नभापार चढवू... ६

'अरबी' लाटांची गाज ही गाते
 पोवाडा मातेचा
सह्यगिरीचा 'कळसु' मिरवी
अभिमान ह्या मातीचा..

चैतन्य झळाळी अशी जणू
लाभावी ती मंथनी
तेवत ठेवू प्रज्ज्वल ज्योती
आस जागवून मनी... ८

मान मराठी चला जागवू
 विश्वाच्या अंगणी
वाकून मुजरा माझा तिजला
मन अर्पण चरणी... ९

शाश्वत आदर्शांचे हे लेणे
रोमारोमी या भिनवू
हवा असे जर पुन्हा 'शिवाजी'
'जिजाऊ'च या आधी घडवू... १०

रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका
जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: