चल ग सखे पंढरीला..(चाल...)
गौरी पूजन
चल ग सखे पुजूया गं गौराईला....२
आवरुन सारे काज
करु गौराईचा साज
आंबील, पोळी पुरणाची नैवेद्याला...
चल गं...
गौरी पूजन
चल ग सखे पुजूया गं गौराईला....२
आवरुन सारे काज
करु गौराईचा साज
आंबील, पोळी पुरणाची नैवेद्याला...
चल गं...
चल चल लवकर... ||धृ||
मुख गौरीचे अतिसुंदर
पैठणी शोभतेया भरजर
चुडा हिरवाही साजे हातभर
चढले मोत्यांचे अलंकार
तो मुकुट आगळा... हो... २
सौभाग्यलेणं ते गळा
दृष्ट लागो न माझी तया रुपाला .... ||१||
बसायला हा चंदनी पाट
मांडूया पंचपक्वान्नी ताट
भातुकलीचा बाई हा थाट
सरली सालभराची वाट
आरास ही भुलवी...... हो... २
मनपाकळी खुलवी..
अडीच दिवसाच्या या माहेराला...||२||
दीपसमया तेवती शेजारी
धूपगंधीत सांज ही न्यारी
विसरला संसार क्षणभरी
मन रमले गं चरणांवरी
मनोभावे पुजूया... हो...२
आरती ओवाळूया
दान सौख्याचं मागूया पदराला
||३||
गीत लेखन
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
०७,०९,२०१९
मुख गौरीचे अतिसुंदर
पैठणी शोभतेया भरजर
चुडा हिरवाही साजे हातभर
चढले मोत्यांचे अलंकार
तो मुकुट आगळा... हो... २
सौभाग्यलेणं ते गळा
दृष्ट लागो न माझी तया रुपाला .... ||१||
बसायला हा चंदनी पाट
मांडूया पंचपक्वान्नी ताट
भातुकलीचा बाई हा थाट
सरली सालभराची वाट
आरास ही भुलवी...... हो... २
मनपाकळी खुलवी..
अडीच दिवसाच्या या माहेराला...||२||
दीपसमया तेवती शेजारी
धूपगंधीत सांज ही न्यारी
विसरला संसार क्षणभरी
मन रमले गं चरणांवरी
मनोभावे पुजूया... हो...२
आरती ओवाळूया
दान सौख्याचं मागूया पदराला
||३||
गीत लेखन
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
०७,०९,२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा