कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

नेत्रपल्लवी


*===============*
          *नेत्रपल्लवी*
*===============*

मदमस्त तो श्रावण भारलेला   

मोहवून तो नेत्रकटाक्ष गेला ||


नेत्रपल्लवीने मनी हालचाली

मज घटिका ती सुखावून गेली ||


माझी न मी रे तत्क्षणी तू चोरले

चितचोर तू राधा तुझी जाहले ||


मनी फुले केवडा, गंध प्राजक्ती 

हसे गाली चाफा मोगरा शेवंती||


साठवून तुज झाले विश्वराणी

बंध विणता गुंतले प्रीतरानी||


स्पर्श मयूरपिसारे अधरांचे

बहरले हे उद्यान जीवनाचे||


रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
11.11.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: