🐯 *एक होती अवनी* 🐯
नरभक्षक वा हिंस्र
पण ती ही एक जीव होती
लुप्त होत चाललेल्या
जंगलाची ती नीव होती..
काय चुकलं होतं तिचं
आपल्या वस्तीत यायला
आपणच आधी गेलो ना
रानी घर तिचे मोडायला... 2
आपणच ना स्वार्थासाठी
जंगल-झाडी केलीत नष्ट
शाकाहारी चराचर मग
झालेत मानवा रुष्ट... 3
त्यांच्याच मागावर पुन्हा
हिंस्र येथे शिरकाव करतात
वाडी-वस्ती, शेतात शिरून
बिचारे नरभक्षक ठरतात... 4
अशीच तिच्या बछड्यांसवे
अवनीही एकदा आली होती
स्वरक्षणार्थ ती ही मग
नरभक्षक झाली होती.... 5
भितीपोटी सारेच तिला
शोध- शोध शोधत होते
साम-दाम-दंड-भेद
आजमावून बघत होते... 6
भावनांचा अभाव नव्हताच
पण कर्तव्यासही जागत होते
जे नव्हतेच करायचे त्यांना
पण तेच घडून चुकले होते... 7
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि.6.11.2018
नरभक्षक वा हिंस्र
पण ती ही एक जीव होती
लुप्त होत चाललेल्या
जंगलाची ती नीव होती..
काय चुकलं होतं तिचं
आपल्या वस्तीत यायला
आपणच आधी गेलो ना
रानी घर तिचे मोडायला... 2
आपणच ना स्वार्थासाठी
जंगल-झाडी केलीत नष्ट
शाकाहारी चराचर मग
झालेत मानवा रुष्ट... 3
त्यांच्याच मागावर पुन्हा
हिंस्र येथे शिरकाव करतात
वाडी-वस्ती, शेतात शिरून
बिचारे नरभक्षक ठरतात... 4
अशीच तिच्या बछड्यांसवे
अवनीही एकदा आली होती
स्वरक्षणार्थ ती ही मग
नरभक्षक झाली होती.... 5
भितीपोटी सारेच तिला
शोध- शोध शोधत होते
साम-दाम-दंड-भेद
आजमावून बघत होते... 6
भावनांचा अभाव नव्हताच
पण कर्तव्यासही जागत होते
जे नव्हतेच करायचे त्यांना
पण तेच घडून चुकले होते... 7
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि.6.11.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा