कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

@🎵बालकविता तू आलास कोठून रे

चाल:- ए आई मला पावसात जाऊ दे

तू आलास कोठून रे


राधा विचारते...
ए थेंबा तू आलास कोठून रे
हे सांग ना गुपित मला वर  गेलास कोठून रे..
ए थेंबा....

थेंब म्हणतो कसा...
(उन्हाळ्यात रवी खूप तापतो...
नभातूनी जणू आग ओकतो...)२
त्या तापाने वाफ होई
जल आकाशी जाते रे...

ए राधा....
कळलं का?||१||


(वाफ जमुनी मेघ साचती...
आभाळी मग खूप नाचती...)२
शीतल वारा स्पर्शताच
पाऊस होऊन येतो रे...

ए राधा ...
कळलं का..?.. ||२||

राधा म्हणते..

पाऊस पडता पाणीच पाणी
ओढे नद्याही जाती भरुनी
शेते पिकती अणि डोलती
मोत्यांनी धरा सजते रे...

ए थेंबा... || ३ ||

गीतरचना
© शिल्पा म.वाघमारे सहशिक्षिका 
जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि 27.08.2019
At 9.05pm

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: