कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

सोमवार, १५ जुलै, २०१९

जन्मदिन

*जन्मदिन*

खूपच होती मजा
माझ्या जन्मदिनी
मामा आणि मामीसह
आली होती मिनी

आजीने आणला होता
परीचा गुलाबी फ्रॉक
आजोबांनी दिला मला
बाबांसारखा लॅपटॉप

घर माझे सजले होते
जणू रुपेरीचांदण्यांनी
थैमानच घातले होते
रंगीबेरंगी फुग्यांनी

बाबांनी मागवला होता
हार्ट शेप आॅरेंज केक
आईने लावली त्यावर
 मेणबत्ती सुरेख

ताईने वाटला होता
सर्वांना गोड खाऊ
मलाही भरवला तिने
मग केक मऊ मऊ

कचोरी, सामोसे नि
चटपटीत पाणीपुरी
आइस्क्रीमच्या कोनसह
पार्टीला मस्त भेळपुरी

मैत्रिणींना भावलं होतं
सुंदर माझं परीसम रुप
नाच, गाणी, दंगा, मस्ती
पार्टीला मजा खूपखूप

📝📝📝📝
शिल्पा म वाघमारे
स.शि., बीड
दि. 01.12. 2018
मो. 9527054205

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: