गुलाबी थंडी
गुलाबी थंडी
नि तुझा सहवास
गोठले श्वास
गुलाबी थंडी
थिजलेली मीठीत
स्वप्ने दिठीत
गुलाबी थंडी
झोंबतोय गारवा
गाते मारवा
एकात एक
आकंठ बुडालेले
विरघळले
श्वासात श्वास
गुंतताना भिजावे
प्रितीत न्हावे
सरुच नये
काळजाचे कोंदण
मधुरपान
नकोस जाऊ
खेळ हा जीवघेणा
येशील पुन्हा
उष्ण ते श्वास
तनु शहारलेली
सेज सजली
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
गुलाबी थंडी
नि तुझा सहवास
गोठले श्वास
गुलाबी थंडी
थिजलेली मीठीत
स्वप्ने दिठीत
गुलाबी थंडी
झोंबतोय गारवा
गाते मारवा
एकात एक
आकंठ बुडालेले
विरघळले
श्वासात श्वास
गुंतताना भिजावे
प्रितीत न्हावे
सरुच नये
काळजाचे कोंदण
मधुरपान
नकोस जाऊ
खेळ हा जीवघेणा
येशील पुन्हा
उष्ण ते श्वास
तनु शहारलेली
सेज सजली
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा