सुस्वागतम सुस्वागतम स्विकारा स्वागता... 2
मान्यवरांच्या पदस्पर्शाने पावन झाली अवनी
स्वागत करूया चला तयांचे शब्द पुष्प उधळूनी
||धृ||
साहित्याच्या उद्यानी, आनंदी फुले उमलली
क्षितिजावरती जणू उधळली, आनंदाची लाली
तमोरूप भावना लोपली, सूर्य साज लेऊनी
स्वागत करूया मान्यवरांचे, शब्द पुष्प उधळुनी ||१||
तारांगण जणू अवतरलेले, साहित्याच्या अंगणी
रंग उधळला वाऱ्यानेही, इथला चहुदिशांनी
अमोल आशिषांचे घन याक्षणी यावे बरसूनी
स्वागत करूया मान्यवरांचे, शब्द पुष्प उधळुनी ||२||
स्वप्न साजिरे मनामनांचे, इथेच साकारले
ध्यास नवा अन् सूर नवा,हे गीत नवे उमटले
स्वरलहरींवर सानंदी,गोजिरी मने थिरकली
स्वागत करूया मान्यवरांचे शब्दपुष्प उधळूनी ||३||
रचना ✍️
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका
जि. प. प्रा. शाळा मालेगाव खुर्द
ता. गेवराई जि. बीड
24.1. 2019

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा