कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, ९ मार्च, २०२४

संत मीराबाई

कृष्णार्पित मीरा


चैतन्य साकार, अद्वैताचा अंश

विकारांचा दंश, अशक्यच ||१||


संताच्या पंगती, बसली हो मीरा

मनाचा गाभारा, कृष्णव्यापी ||२||


दंगली भक्तीत,कृष्णरंगी न्हाली

नामामृत प्याली, मीराबाई ||३||


जनपथ सारे, भरुनी पावले 

पायधूळ ल्याले, सर्वांगासी ||४||


कृष्ण प्राणसखा, श्वासा संजीवनी 

न लगेच कुणी, तयाविन ||५||


कृष्ण हेच सुख, विषय ते काटे

विषही पालटे, अमृतात ||६||


अखंड गुंफण, नाम मोतियांची 

कोंदण भक्तीची, मीराबाई ||७||


जाणला हो कृष्ण, मीरेनेच खरा

तुजला का नरा, उमगेना ||८||


जाणला हो कृष्ण, मीरेनेच खरा

तुजला का नरा उमगेना || ९||


काव्यरचना

©शिल्पा म.वाघमारे

(शिक्षिका) अकोला

भ्र. क्र. 8830680101

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: