आठवते का तुला?
आठवते का तुला?
तू किती मला छळायचास...
कवितेच्या ओळी बनून
ओठांवरती रुळायचास...
अवचितच सुरेखसे
गुंफले जायचे शब्द
प्रश्नांचे भडीमार नि
तू स्वप्नातही निःशब्द
वेडावले होते मी
विरहात जळताना
त्राण न होते उरले
हे सारे साहताना
विरहाची संपली वाट
तो काळ अखेर सरला
मन वैरी शांत जाहले
प्रितीचा वसंत फुलला...
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा