कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

आठवणीतील प्रेम



आठवणीतील प्रेम


नातं तुझं माझं प्रिया

नातं अनोखं जन्मांतरीचं

देह जरी वेगळाले राया

एक स्पंदन आहे हृदयाचं...

अस्तित्व तुझ्यात गवसते माझे

पहावया केवळ 'ती'नजर हवी

मी धरा आसुसलेली सर्वदा 

तव प्रितीने उमलेल नवी... 


प्रेमसंज्ञा तुझी नि माझी

दोन देहांचेच का रे मिलन? 

की शब्दातीत असे काही 

अमृतस्पर्शी नवसंजीवन... 


तुझ्या डोळ्यांतील शब्द 

मम् साश्रू नयनांनी वाचावे

भाव मुके ओठांतच मग का 

आपसूकची विरघळून जावे... 


वाचनांस जागूनिया आपण

उमलूया पुन्हा पुन्हा धरणीवरी

आदर्श प्रितीचा वसवू विश्वगाव

'जन्म' कर्मांचा भोग जरी... 


© शिल्पा म वाघमारे सहशिक्षिका, गेवराई, जि. बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: