कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, २१ मे, २०२३

तोड जन्मबेडी

 

तोड जन्मबेडी 


अरे संसार संसार

कधी कुणा उमगला

फक्त वाहतो प्रवाही

कुणा नाही समजला... १


कर्म आणि कर्तव्याच्या

पथावर होई स्थिर

नित्य खेचती विषय

     जीवाला का रे सत्वर...२


किती सावरु सांभाळू

तोल जाता, घसरतो

वारे शुष्क चहुकडे

     मनी तम पसरतो... ३


वाहुनिया टाकशील 

प्रेम शुद्ध सारे जरी

अव्हेरील अविचारे 

या संसारसागरी... ४


मोल नच कोठे बाकी

झाली हृदये दुष्काळी

तूच तार या विश्वागरा

     येई येई वनमाळी...५


नको नको मोक्ष मज

तयासाठी ना मी वेडी

भक्ती देई तुझे पायी 

तोड बापा जन्मबेडी... ६


रचना

शिल्पा म.वाघमारे

सहशिक्षिका बीड

दि ३०.०६.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: