*गणित जीवनाचे*
मानव जन्म हेच कोडे
अवघड अगणित वाटांचे
मती गुंगते पडते पेचात
सुटेना गणित जीवनाचे. .. १
कर्तव्याचा खुणावे भाव
कुठे 'मोहाचे' ते पाश
मन-मती खेचाखेच
थबकलेच मग श्वास... २
निश्चय दृढ तो करु जाता
मुग्ध करण्या 'माया' वाहे
'वासनांचा' शैवाल स्निग्ध
स्वतःकडेच मज ओढू पाहे...३
चित्त धरेनाच थारा कुठे
किती खेचले होते लगाम
तुफानांत विचारपेचाच्या
धावे मन का स्वैर बेफाम? ... ४
रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द जि बीड
दि २५.०५.२०२०
भ्र क्र ९५२७०५४२०५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा