कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ७ जुलै, २०२१

माणसासारखं.. पावसाचं

 माणसासारखं... 


सर्वांना चांगलीच मानवली सुट्टी

मी तेवढी घेतली तर लगेच खुपलं

उगाचच नाही करत हो हट्टीपणा

मनमानी वागण्यानं, मन थोडं दुखलं


म्हटलं कधी घेऊन सुट्टी 

ढगांच्या गादीवर जरा लोळू

तुमच्या तऱ्हा नाहीत सरणार

मग काय सखीला तरसत सोडू


येतो येतो, आश्वासन देतो

पण वचन नाही हो देत मात्र 

बघतो वागून माणसासारखं

जरा ढकलत नक्षत्रांचे सत्र


✍🏻✍🏻✍🏻

शिल्पा म वाघमारे 

सहशिक्षिका बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: