दिवाळी शुभेच्छा...
दिवाळी येणार येणार येणार गं
मज्जा आमुची बाई होणार गं...
शाळेला सुट्टी
दंगा नि मस्ती...
मुळीच अभ्यास मी नाही करणार गं...
चटकदार चिवडा
कुरकुर चकली
डोळा चुकवून आईचा पळवणार गं...
गुलाबजाम लाडू
करंज्या नि वडी
मनभरुन खायला मिळणार गं.....
नवेनवे कपडे
सुरसुऱ्या फटाकडे
काळजी घेऊनच बरे मी फोडणार गं...
चला लागूया कामाला
मदत करुया आईला
शहाण्यासारखं बाई वागणार गं...
बाबा नि आई
शाळेतल्या बाई...
शुभेच्छापत्र तुम्हा मी देणार गं...
Happy Diwali...
Happy Diwali...
पुन्हा शाळेत भेट आता होणार गं....
रचना
©शिल्पा म वाघमारे
स शिक्षिका बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा