कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

अधीर मन, अधीर क्षण

हा अहम् नव्हे रे प्रिया
 लकेर आहे ही लाजेची
समजून कधी घेशील तू
अवखळ लकब ही प्रितीची

अनोळखी न तू,
न मी ही तुझ्यासाठी
ती नजरेची चंचल भाषा
नवखी का अपुल्यासाठी...

का अडून राहिलेला
तू वळवून अशी मान
त्या मदहोश अधरस्पर्शासाठी
आतुरले मनाचे शुष्क रान
एकटी मी इथे अन् तू तिथे
जरी देहाने शांत येथे
मनसरिता वाऱ्यावत पळते आहे
प्रीतसागर आहे तेथे

पुरे हा बहाणा सजना
का दवडशी पळ हा मलूल
तू.. मी.. करण्याची का रे वेळ ही
तू ही याच वाटेवर असशील ना कधी प्रतिक्षा ही संपेल?

धडधड ही वाढते आहे...
चलबिचल अनोखी कुठूनशी आली
सत्यात येऊदे ती स्वप्ने तुजसाठीच जी होती रंगवली.
अव्यक्त ते व्यक्त होऊ दे... शब्दांतून नाही...तर स्पर्शातून....


✍🏻 *शिल्पा म वाघमारे *
सहशिक्षिका, जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि १६.१२.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: