कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

देवा

Pyramid रचना


मी
तव
चरणी
वाहे भाव
मधुसूदना
पार नेई नाव
आर्त या लेकराची


हे
हरी
येई रे
झडकरी
कृपाकटाक्ष
देई मजवरी
रखुमादेवीवरा

ते
मम्
भाग्यची
मुर्त डोळा
पांडुरंगाची
देखिन ज्या क्षणा
सोहळा अगम्यची

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
6/5/19

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: