कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

होयीची कर

होयीची कर... 

होयीची कर
मटनावर भर
देशी अन् बिअर
भांगाची पावर
दोस्त म्हणे सावर
संद्याकायी दाखोलं घर
बायकोनं जसं पायलं वर
झटक्यातच उतरली सरसर
गाठलं म्या सैपाकघर
भाकरी केल्या दवडीभर
वरण टाकलं चुलीवर
भांडेबी घासले टोपलभर
तरी जेव्याले नाई देलं पोटभर
म्हणे उठाबशा काढ, कान धर
आठोन राईन हे मले जल्मभर
.... होईची कर होईची कर.. 

😝शिल्पा म.वाघमारे सहशिक्षिका बीड
6/5/19, 08:50 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: