कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

वृद्धत्व

वृद्धत्व 


जन्म हा मानवाचा
का आणि कशासाठी?
या विचारांनीच माझ्या 
मन-मतीत नित्याची दाटी... १

बाल्य, तारुण्य सरले
काळ सुखाचा लोटला
कर्मकर्तव्यात वाहता
आलो आहे शेवटाला.. २

कधी होते ऐकले मी
आज भोगतो भार्येसंगे
संसारगाडा ओढताना
झिजवीत विविधांगे... ३

वृद्धपण आपुल्यासाठी
खरे शापित भोग झाले
आधार हवा होता जेव्हा 
जीव निराधार हे झाले... ४

तू नीज इथेच शांत
मी अजून तुझाच आहे
नाही मोजले तुझे मी कष्ट
पण हिशेब जुळवतो आहे... ५

श्वासात श्वास हा आहे
तोवर सखे तुज जपेन 
देऊन श्वास माझाही
वचन पहिले मी पाळीन... ६

रचना
©शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि १.१०.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: