कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

प्रीत तुझ्यावर जडली

प्रीत तुझ्यावर जडली


प्रीत तुझ्यावर जडली
भान हरवलेच माझे
कशी वर्णू प्रिया सांग
शब्दही आज सारे तुझे.. १

हसे अंगणी सोनचाफा
माझ्या असल्या दशेवर
कावरीबावरी नजर
शोधे तुजला सैरभैर...२

तूफान चेतले रानात
त्याचा भडका रे उडाला
गुंतले मी नव बंधात
ये ना तूच विझवायला...३

विसरून सारीच नाती
मागे टाकूनिया हे जग
फक्त फक्त तूच रे आता
प्रीतफुला निववी धग...४

तूच उपचार व्याधीचा
असशी त्या तूच कारण
फुलव ना बकुळगंध
तूजला सर्वस्व अर्पण... ५

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: