*कशी सांगु तुला*
कशी सांगु तुला
रोजचे मरण
मीच माझे जणू
रचते सरण ॥१॥
किती जागु सांग
तुझ्याविन रात्री
बोचती फुलेही
विरहाशी मैत्री ॥२॥
भडकली बघ
काळजाची आग
मन सैरभैर
सोसवेना धग ॥३॥
सांगू तरी कुणा
श्वासांचे गार्हाणे
श्वासात अबोल
गुंतले तराने ॥४॥
कशी सांगु तुला
रोजचे मरण
मीच माझे जणू
रचते सरण ॥१॥
किती जागु सांग
तुझ्याविन रात्री
बोचती फुलेही
विरहाशी मैत्री ॥२॥
भडकली बघ
काळजाची आग
मन सैरभैर
सोसवेना धग ॥३॥
सांगू तरी कुणा
श्वासांचे गार्हाणे
श्वासात अबोल
गुंतले तराने ॥४॥
उदास भयाण
मनाचा गाभारा
पोळती रे मज
श्रावणाच्या धारा ॥५॥
जगते कशाची
नित्य हे मरण
तुच उपचार
तुच रे कारण ॥६॥
रचना---------📝
*शिल्पा म.वाघमारे*
स.शि.
बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा