कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

जीवनाच्या वाटा

जीवनाच्या वाटा

दिधल्या गेल्या मजला
जीवनाच्या वाटा अगणित
मती गुंगली होती पेचात
सुटेनाच मला हे गणित... 1

कुठे कर्तव्याचा भाव
कुठे 'मोहाचे' ते पाश
मन-मती खेचाखेच
थबकले मग श्वास... 2

निश्चय तो करु जाता
 मुग्ध करण्या 'माया'वाहे
'वासनांचा' शैवालही
स्वतःकडे ओढू पाहे... 3

चित्त धरेनाच थारा
किती खेचले लगाम
तुफानांत विचारांच्या
धावे मन हे बेफाम... 4

बहु प्रयासे एकवटले
मीच माझी सावरुनी
चैतन्यास त्या साधले
'स्व' वाहूनीच चरणी... 5

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि 1.1. 2019
6/5/19,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: