कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

माझी कविता

माझी कविता

काळोखाची शाल फेकून
प्रभात होते कविता
शब्दांत मलूल हसते
सुरात सजते कविता...१

अंतराच्या स्पंदनांचा
ठाव घेते खोलखोल
जीवनाच्या विचारद्वंद्वांवर
स्वार होते  माझी कविता...२

पुष्पांहुन कोमल जी
कस्तुरींसही गंध देते
सुर्यासम तेज लेऊन
स्वयंप्रकाशी होते माझी कविता...३

प्रतिभेच्या गर्भातून जेव्हा
नवजन्म घेई शब्द
मधूर हास्यखळी निरागस
आनंद शिंपते माझी कविता...४

रचना
शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि १७.१०.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: