तुळस
माझ्या अंगणाची शोभा
चैतन्याची जणू आभा
दर्शनाने धन्य प्रभा
आरोग्याची गं नांदी... १
परसाला आले रुप
लख्ख प्राणवायू दीप
सांज घालावी समीप
तुझ्याच भोवताली... २
पावित्र्याचा तू आदर्श
श्वास फुले, होता स्पर्श
संध्याप्रभातीचा दर्श
तुळसाई माऊली...३
मंजिरीची सुवास तो
घमघमाट गं घुमतो
बाळकृष्णासि भावतो
वृंदे तुझ्या गे मंजुळा... ४
आरोग्यदायिनी माते
भक्तिभावाने पुजिते
दान देई सौभाग्याते
नमामि विष्णूप्रिये...५
शुद्ध कार्तिक द्वादशी
माधवाशी तू बंधशी
होऊनिया पापनाशी
रक्षी रक्षी गं आम्हास... ६
रचना
शिल्पा म. वाघमारे (कुलट)
अकोला
दि ५.११.२०१९
माझ्या अंगणाची शोभा
चैतन्याची जणू आभा
दर्शनाने धन्य प्रभा
आरोग्याची गं नांदी... १
परसाला आले रुप
लख्ख प्राणवायू दीप
सांज घालावी समीप
तुझ्याच भोवताली... २
पावित्र्याचा तू आदर्श
श्वास फुले, होता स्पर्श
संध्याप्रभातीचा दर्श
तुळसाई माऊली...३
मंजिरीची सुवास तो
घमघमाट गं घुमतो
बाळकृष्णासि भावतो
वृंदे तुझ्या गे मंजुळा... ४
आरोग्यदायिनी माते
भक्तिभावाने पुजिते
दान देई सौभाग्याते
नमामि विष्णूप्रिये...५
शुद्ध कार्तिक द्वादशी
माधवाशी तू बंधशी
होऊनिया पापनाशी
रक्षी रक्षी गं आम्हास... ६
रचना
शिल्पा म. वाघमारे (कुलट)
अकोला
दि ५.११.२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा