श्वास.... विश्वासाचा
धर्मग्लानी ही असे महिमा
कलियुगाच्या फेऱ्याची
विश्वासाचे मोलं न कोणा
चुकली वाट कर्तव्याची ॥१॥
विश्वासाची रोपे कोमल
अंतरात फुलवायची
त्याच बळावर टिकून आहे
सार्थकता जीवनाची ॥२॥
विश्वासाचा श्वास देऊन
प्रेम फुले उमलवायची
शुद्ध अंतःकरणानेच
प्रीतवेल बहरवायची ॥३॥
विश्वासाच्या धाग्यातच
गुंफण असावी स्नेहाची
तेव्हाच राहतील अतूट
बंधने अपुल्या नात्यांची ॥४॥
माणसांच्याच जगात या
किंमत ना माणुसकीची
ग्रासला,भारला विकारे
सोडून दोरी आपुलकीची ॥५॥
दामात कधी होणार नाही
मोजदाद विश्वासाची
जाता तडा मग एकदाही
खात्री न पुन्हा प्राप्तीची ||६||
रचना
📝📝📝
*शिल्पा म.वाघमारे*
स.शि. मालेगाव खुर्द
ता.गेवराई, जि.बीड
( १३.०६.२०१८)
धर्मग्लानी ही असे महिमा
कलियुगाच्या फेऱ्याची
विश्वासाचे मोलं न कोणा
चुकली वाट कर्तव्याची ॥१॥
विश्वासाची रोपे कोमल
अंतरात फुलवायची
त्याच बळावर टिकून आहे
सार्थकता जीवनाची ॥२॥
विश्वासाचा श्वास देऊन
प्रेम फुले उमलवायची
शुद्ध अंतःकरणानेच
प्रीतवेल बहरवायची ॥३॥
विश्वासाच्या धाग्यातच
गुंफण असावी स्नेहाची
तेव्हाच राहतील अतूट
बंधने अपुल्या नात्यांची ॥४॥
माणसांच्याच जगात या
किंमत ना माणुसकीची
ग्रासला,भारला विकारे
सोडून दोरी आपुलकीची ॥५॥
दामात कधी होणार नाही
मोजदाद विश्वासाची
जाता तडा मग एकदाही
खात्री न पुन्हा प्राप्तीची ||६||
रचना
📝📝📝
*शिल्पा म.वाघमारे*
स.शि. मालेगाव खुर्द
ता.गेवराई, जि.बीड
( १३.०६.२०१८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा