👧🏻 *बालमना आकारु* 👦🏻
कलिकेसम मृदू सोज्ज्वळ त्या
बालमनास चला हो आकारु
संस्कार, शिस्त, मोकळीक देऊनी
प्रज्ज्वल प्रज्ञा ती साकारू... *१*
महाकाय तो वृक्ष बालमन
सूक्ष्म बीजरुपी लपलेला
मायेच्या ओलाव्याचे सिंचन
उज्ज्वलतेप्रती झेपावलेला.. *२*
शीतल वाऱ्यासवे वाहणारे
बालमन जणू की विहंग
लादून तुमचे विचार ओझे
नका करु दिव्यस्वप्न भंग... *३*
बालक म्हणजे फक्त वरवर
दिसणारी एक इवली मुर्ती
निद्रिस्त अद्भुत शक्ती चेतवा
दिगंतात पसरेल सत्किर्ती... *४*
बालमन एक गगनभरारी
प्रदीर्घ विश्वाच्या मुक्तांगणी
प्रेरणा हिच ठरेल ऊर्जा
यशशिखर गाठण्या जीवनी.. *५*
शिक्षक आणि पालकांसाठी
अजब आव्हान असतं बालमन
नका कुस्करु त्या कोमल भावना
अहंभावाच्या अधिन होऊन.. *६*
ज्ञानसूर्ये अगणित तेजस्वी
उजळाया कलियुगाचा माथा
ज्ञाना-तुका ही तीच उद्याची
इंद्रायणीतील तरलेली गाथा *७*
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द ता. गेवराई जि. बीड
कलिकेसम मृदू सोज्ज्वळ त्या
बालमनास चला हो आकारु
संस्कार, शिस्त, मोकळीक देऊनी
प्रज्ज्वल प्रज्ञा ती साकारू... *१*
महाकाय तो वृक्ष बालमन
सूक्ष्म बीजरुपी लपलेला
मायेच्या ओलाव्याचे सिंचन
उज्ज्वलतेप्रती झेपावलेला.. *२*
शीतल वाऱ्यासवे वाहणारे
बालमन जणू की विहंग
लादून तुमचे विचार ओझे
नका करु दिव्यस्वप्न भंग... *३*
बालक म्हणजे फक्त वरवर
दिसणारी एक इवली मुर्ती
निद्रिस्त अद्भुत शक्ती चेतवा
दिगंतात पसरेल सत्किर्ती... *४*
बालमन एक गगनभरारी
प्रदीर्घ विश्वाच्या मुक्तांगणी
प्रेरणा हिच ठरेल ऊर्जा
यशशिखर गाठण्या जीवनी.. *५*
शिक्षक आणि पालकांसाठी
अजब आव्हान असतं बालमन
नका कुस्करु त्या कोमल भावना
अहंभावाच्या अधिन होऊन.. *६*
ज्ञानसूर्ये अगणित तेजस्वी
उजळाया कलियुगाचा माथा
ज्ञाना-तुका ही तीच उद्याची
इंद्रायणीतील तरलेली गाथा *७*
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द ता. गेवराई जि. बीड
- दि.14.11.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा