कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

परपंच

परपंच

जल्म भेटते परतेकाले
त्याच्या करमापरमानं
कर्तव्य करनं सोडू नाई
संसारामंदी परतेकानं... १

पुळे इन ते कर्म
नेटानं करत राहाव
अन् ज्यानं सृष्टी बनोली
त्याले बी नाई इसराव...२

जीभ रायते आपली जशी
बत्तीस दाताच्या मंदात
तसंच राहाव मानसानं
मोहमायेच्या चमचम जगात...३

शेवा कर मानसाची
मानुसकी जिती ठुई मनात
ईठ्ठलाचं नाम जपत रायाले
संन्यास नसते घ्या लागत...४

मोक्ष भेट्यासाठी तुले
परपंच सोडून चालनार नाई
नेटानं कर्म करत राय तू
देव भेटल्याशिवाय राह्यनार नाई...५

रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका, बीड
(अकोला)
17.05.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: