*तुझ्या ओठांवरचा तीळ*
तुझ्या ओठांवरचा तीळ
पेरला काळजाच्या रानी
आनंदाचं डुले पीक शिवारी
वाहे झुळझुळ प्रितपाणी
ओठ भिडता अधरी
ठिणग्यांची बरसात
मग भडकते गं आग
आसावल्या या ऊरात...
कसा सावरु मी मला
पुरता मी बावरलो
नजरबाण रोखताच
मीच माझा सावरलो...
वाटे सदा माझ्या मना
की तुझा तीळ चोरावा
नजरा खिळवणाऱ्यावर
हक्क माझाच असावा...
तीळ तीळ तुटतो जीव
जातानाही आॅफिसात
धावे माघारीच धुंद मन
पुन्हा भिजण्या पावसात....
रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
20.11.2018
तुझ्या ओठांवरचा तीळ
पेरला काळजाच्या रानी
आनंदाचं डुले पीक शिवारी
वाहे झुळझुळ प्रितपाणी
ओठ भिडता अधरी
ठिणग्यांची बरसात
मग भडकते गं आग
आसावल्या या ऊरात...
कसा सावरु मी मला
पुरता मी बावरलो
नजरबाण रोखताच
मीच माझा सावरलो...
वाटे सदा माझ्या मना
की तुझा तीळ चोरावा
नजरा खिळवणाऱ्यावर
हक्क माझाच असावा...
तीळ तीळ तुटतो जीव
जातानाही आॅफिसात
धावे माघारीच धुंद मन
पुन्हा भिजण्या पावसात....
रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
20.11.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा