कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

सोमवार, १५ जुलै, २०१९

मीठीत तुझ्या

मीठीत तुझ्या...



शहारले का हे
अंग अंग आज
शृंगाराविनाही
चढलाय साज..... १

 तुझ्या प्रितीचा
ल्याले मी रे रंग
मनीमानसी कसे
उठले शब्दतरंग.... २

ओठांवरी आली
अवचित लकेर
घटिका समीप
छेडतेया तार..... ३

ये जरा बाहेरी
बघ आसपास
निसर्गही सज्ज
माझ्या स्वागतास.... ४

गंधीत केवडा
उमले मोगरा
खुणावतो तुज
माळण्या गजरा.... ५

जातील साजना
दिस हे चार भूर
मीठीत त्या धुंद
होईन मी चूर... ६

नयनबाण ऊरी
खोल रुतलेले
प्रितजळाचे मधूर
बांध फुटलेले... ७


अधररसपाना
अधीर होऊनी
सख्यासागराकडे
वाहते मी तटिनी...८

रचना
©शिल्पा म. वाघमारे
मालेगाव खुर्द 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: