वृत्त : भुजंगप्रयात
लगागा लगागा लगागा लगागा
कशाचे पुन्हा भेटणे बोलणे रे
कुठे आसवांचे घडे ओतणे रे...
वेचू कसे विखुरले स्वरांचे पिसारे
अन् आता कुणासाठी तया माळणे रे...
तुझ्या आठवांची जपूनी कुपी ही
मनाने मनाशीच समजावणे रे...
फुले ती कधी तू दिली ओंजळीत
पुन्हा गंध तो वेचता सांडणे रे ...
मला का सदा तो छळे दृष्ट वारा
बटांनो नको ते म्हणे ... सोडणे रे...
कुणी वाट माझी करा मोकळी हो
नदीचे कधी का बरे गोठणे रे...
शिल्पा म. वाघमारे
सहशिक्षिका बीड
19.08.2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा