साल सरता सरता...
नवी पहाट, नवा संकल्प
नवविचार, नवभावना
गळोत तम,विकार सारे
लाभावी नवचेतना ||१||
जीवनाचे या ध्येय कळावे
दिव्य तेजाची लागो आस
आयुष्याचे सोने होण्या
सत्पथाचा लागो ध्यास ||२||
मात करण्या विकारांवरी
अचाट बळ संचारावे मनी
चैतन्यस्फुरणे चेतावी अशी
व्हावे निर्मळ आनंदाचे धनी ||३||
या वाटेवरच्या प्रत्येकाचे
मनरान असे भिजवावे
झोकून द्यावे देता - देता
"मी पण" ही तेथ विरावे || ४||
आर्तशरण्या तुझ्या कृपेने
वाट मिळो स्वप्नांना
तुज भाळीचे तेज दे अन्
स्थितप्रज्ञता देई या मना||५||
जाहलो सज्ज स्वागता
गाली स्मितफुले घेऊनी
नवोन्मेषात न्हाऊ दे क्षणक्षण
शुभाकांक्षा हिच या मनी ||६||
रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि. ३१/१२/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा