कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

घामातून फुलले मोती

 वादळं वारे तुफान

पाऊस अवकाळी

कष्टकऱ्यांच्या तो

जीवाला नित्य जाळी


अळी व रोग किट

पिकास बिलगले

पाहून दृश्य सारे

स्वप्न भविष्याचे भंगले


क्षणात विरत गेला

बेगमीचाही आनंद

विरत चालला श्वास

विचार झाला बंद


प्रदीप्त आशावाद

सरलाच हो कधीचा

श्रमलो झिजलो जरी

ऊरी काहूर काळजीचा


दारा पोरांची आता

पुन्हा तीच का गत?

जडेल कष्टकऱ्याचं

उद्या भूकेशी नातं


हतबल श्रमिक जगी

रोज पुन्हा मरतो!

घामाच्या मोत्यांचे

मोल कोण जाणतो?


देवा तूच रे तारी

दे मोल तरी परतोनी

घाव जिव्हारी लागला

जन्म लागू दे कारणी..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: