कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ मे, २०२०

घर



घर

स्वप्न डोळ्यांत खेळते
घर हवे टुमदार
चार भिंतीसह त्यात
मिळो मायेचा आधार...१

हर्षे फुलावी सजावी
मृदुगंधी सुमांपरी
वीण विश्वाससुताची
नाती व्हावी भरजरी...२

सूर द्यावा सजनाने
शब्द सखीने गुंफावे
निरागस भाव नित्य
काळजात लहरावे... ३

बाळासाठी त्या तान्हुल्या
व्हावे संस्कार सरिता
भाव स्थितप्रज्ञ यावा
जगी नवख्या ते जाता...४

बहरावी मनोद्याने
विषयांस नको थारा
हेवा वाटावा जगास
घर व्हावे प्रेमझरा...५


रचना
©शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि.२४.१०.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: