महापूर (अष्टाक्षरी)
*प्रलयांची नांदी*
सांग आज तुझ्या माझ्या
अस्तित्वाला काय अर्थ
हात झाले तोकडेच
घोर सामोरी अनर्थ १
जल जाळतेया जीवा
तृषा का ते भागवेना
सुन्न झाली स्पंदनेही
डोळा आता पहावेना २
खचलेल्या धरेसवे
तरलेले जीव थोडे
तगमग श्वासांची नि
रिक्त हाती उभे कोडे ३
आसवांची दाटी झाली
महापूर भावनेला
अक्षबांध फुटलेत
आधारही निसटला ४
निराशेच्या गर्तेत त्या
स्तब्ध जीवनप्रवास
प्रलयांची आली नांदी
विरलेत कुंद श्वास ५
कोनाड्यात मनाच्या रे
तेवणारी आस वाहे
विखुरल्या काळजात
दीप्त तो विश्वास आहे ६
उसवल्या माणसांच्या
मर्मबंध नि भावना
आपत्तीच हवी का हो?
जागवण्या संवेदना ७
बाप निसर्ग कोपला
देई मायेची पाखर
वाताहात करताना
आम्हा फळांचा विसर ८
रचना
शिल्पा म वाघमारे
स.शि.बीड
दि.८.९.२०१९
*प्रलयांची नांदी*
सांग आज तुझ्या माझ्या
अस्तित्वाला काय अर्थ
हात झाले तोकडेच
घोर सामोरी अनर्थ १
जल जाळतेया जीवा
तृषा का ते भागवेना
सुन्न झाली स्पंदनेही
डोळा आता पहावेना २
खचलेल्या धरेसवे
तरलेले जीव थोडे
तगमग श्वासांची नि
रिक्त हाती उभे कोडे ३
आसवांची दाटी झाली
महापूर भावनेला
अक्षबांध फुटलेत
आधारही निसटला ४
निराशेच्या गर्तेत त्या
स्तब्ध जीवनप्रवास
प्रलयांची आली नांदी
विरलेत कुंद श्वास ५
कोनाड्यात मनाच्या रे
तेवणारी आस वाहे
विखुरल्या काळजात
दीप्त तो विश्वास आहे ६
उसवल्या माणसांच्या
मर्मबंध नि भावना
आपत्तीच हवी का हो?
जागवण्या संवेदना ७
बाप निसर्ग कोपला
देई मायेची पाखर
वाताहात करताना
आम्हा फळांचा विसर ८
रचना
शिल्पा म वाघमारे
स.शि.बीड
दि.८.९.२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा