कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

परिचय

परिचय


मी शिल्पा म.वाघमारे
जन्म: 20. 02.1983
शिक्षण : HSC DEd
ऐजन्मापासूनच अपंगत्व आले... मात्र मम्मी - पप्पांनी कधीच जाणीव होऊ दिली नसदैव प्रेरणा देऊन मनालाएघ8सशक्त बनवले. शिक्षणाची खूप आवड आहे.
शाळेत तसेच स्काॅलरशीप व नवोदय सारख्या हप्तासर्व परीक्षांत अव्वल राहिले. 9 . आत्मविश्वास आणखीच वाढत होता.
नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी होण्याचे
भाग्य लाभले.
पुढे बारावी Science नंतर डि. एड् केले. आज
सहशिक्षिका या पदावर
जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
येथे गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये रमायला खूप आवडते.
नेहमी नवनवीन उपक्रम करुन मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने प्रयत्नरत असते.
त्यांनाही कविता रचायला प्रेरित करत असते.
मी *उपक्रमशील शिक्षक समूह महाराष्ट्र* परिवाराची सदस्य आहे.

   नवोदय मध्ये शिकत असतानाच पाचवीपासून कविता रचण्याची प्रेरणा मिळाली व गायन विषय असल्याने ती ही आवड रुजली.
Best Singer of the year हा award ही 1996 मध्ये मिळवला.
  गायन समूहात आजही गाणी गात आहे.

संसार व ड्युटीच्या ओढाताणीत कविता रचणे जणू विसरूनच गेले होते.
अचानक 2015 मध्ये आमचे आदर्श विस्तार अधिकारी साहेब यांच्यावर रचना केली. त्यांनी प्रेरणादायी प्रतिक्रियेतून ती खूप आवडल्याबद्दल सांगितलं व "लिहित रहा... काव्यसंग्रह प्रकाशित करु" असे म्हणताच नवीन ऊर्जा संचारली. अनेक वर्षांपासूनची धूळ झटकून पुन्हा रचना करायला लागले.
बर्‍याच कविजनांनी अचानकच विविध समूहात सहभागी केले. तेथेही विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ विविध मान मिळत आहेत.
*2017 मध्ये राज्यस्तरीय काव्य संमेलन लातूर येथे उत्तेजनार्थ कवितेसाठी निवड होऊन सन्मान करण्यात आला.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: