कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

पुलवामा हल्ला


पुलवामा हल्ला 


पुलवामा धरेवर
हल्ला भ्याड झाला आहे     
  तो जगवणाराच श्वास
आम्ही गमावला आहे... 1

ज्योती मागवा आतून
ध्येय मिळवण्यासाठी 
विकृतीने साकारलेल्या
काळोखास गिळण्यासाठी...2

 क्रोधाग्नीच उसळला
भडकाही उडणार
वणव्यात माजलेली
मस्ती आता जिरणार.. 3

नरदैत्या अंतरीच्या
संवेदना हरवल्या
रुक्ष वाळवंट मनी
क्रूर भावना पोसल्या... 4

मातृ रक्षणार्थ वनी 
धुंडाळतो दाही दिशा
कर्तव्यापायीच त्याग
एक करी दिन-निशा... 5


धारातीर्थी जवानांचे
रक्तपाट प्रेरताती
बदलाच मागतात
क्षणोक्षणी देती स्फूर्ती... 6

देश सोपवून गेले
विश्वासाने आम्हा हाती
श्वास शेवटाचाही तो
फुगवून गेला छाती... 7


देश हाच आस श्वास
त्यागी संसार बंधने 
अखेरच्या श्वासावत 
गातो भारत कवणे... 8

रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि. 22.02.19

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: