कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

हरवलेलं प्रेम.. माणुसकी



*हरवलेलं प्रेम*

हरवले ते प्रेम अन्
माणुसकी माणसाची
जीवनाच्या बेटावरती
खडकं राहिली स्वार्थाची. .॥१॥

भ्रष्टाचाराचे तर इथे
नित्य वाहतात वारे
नीतीमुल्यांच्या देहावर
नवलाईचे शहारे. . ॥२॥

वासना डोळयांत कधीही
अवचित इथे जागते
विश्वासाचे कोंडले श्वास
भिक प्रेमाची मागते. . ॥३॥

शुद्ध प्रेमच हरवले हो
फक्त बेगडीच उरले आहे
प्रितीच्या खोट्या नावाखाली
स्वार्थाने दुकान थाटले आहे ॥४॥

विरत चालला दिवसेंदिवस
प्रेमाचाही खरा अर्थ 
नाती फक्त नावापुरती
काळच मोठा धुर्त ॥५॥


रचना
शिल्पा म.वाघमारे
  स.शि.बीड
भ्र.क्र.९५२७०५४२०५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: